धावत्या रेल्वेच्या धक्क्याने ट्रॅकमनचा दुदैवी मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्तव्यावर असताना कुठल्यातरी रेल्वे गाडीची जोरदार धडक बसल्याने भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा शनिवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता वाजता मृत्यू झाल्याची घटना साकेगाव नजीक घडली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  नितीन हरीशंकर सोनार (वय-४२, गडकरी नगर, भवानी माता मंदिराजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळ वाघूर नदीच्या अलिकडे खांब क्रमांक ४४८/७-९ मध्ये रेल्वे लाईनीवर नितीन सोनार यांचा मृतदेह आढळला. तसेच त्यांच्या रेल्वे रूळच्या बाजूला दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ५५१७) उभी होती.  कर्मचार्‍यांना सोनार यांचा मृतदेह आढळताच त्यांनी रेल्वे प्रशासनाला माहिती कळवली तसेच मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर डॉ.मयुर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. त्याच्या भुसावळ तालुक्याचे हवालदार वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई, रसीद तडवी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी शेख निसार शेख उमर यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मीक सोनवणे, संजय भोई करीत आहेत.

Protected Content