दाळफळ परिसरातील विवाहितेला पैशांसाठी छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील दाळफळ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून व्यवसाय वाढविण्यासाठी माहेरहून १० लाख रूपयांची मागणी करत शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील दाळफळ परिसरातील माहेर असलेल्या कोमल सुरज उपाध्याय (वय-२८) यांचा आंध्रप्रदेशातील उस्मान गंज येथील रहिवाशी सुरज राजाराम उपाध्याय यांच्याशी २०१९ मध्ये रितीरिवाजानुसार लग्न झाले आहे. सुरज याला दारू, गांजा, ब्राऊन शुगर पिण्याचे व्यसन आहे. वाईट व्यसनांना विवाहितेने विरोध केल्याने तिला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच व्यावसाय वाढविण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पती सुरज याच्यासह सासू आणि सासरे यांनी छळ केला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्यात. त्यानंतर विवाहितेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पती सुरज राजाराम उपाध्याय, प्रेमाबाई राजाराम उपाध्याय, सासरे राजाराम रामचंद्र उपाध्याय सर्व रा. उस्मान गंज, आंध्रप्रदेश यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.

Protected Content