पाचोरा येथे शहीद दिन साजरा

 

पाचोरा, प्रतिनिधी !  पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल येथे आज  शहीद दिन साजरा करण्यात आला.

 

शहीद दिनानिमित्त थोर देशभक्त क्रांतिकारक हुतात्मा शहीद भगतसिंग, सुकदेव व राजगुरू यांच्या  प्रतिमेस माल्यार्पण व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे व कार्यालय प्रमुख अजय सिनकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.

 

Protected Content