सार्वजनिक बांधकाम विभागात चॉपर काढल्याने उडाला गोंधळ!; ठेका घेण्यावरून वाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ठेका घेण्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा वाद झाला आहे. दोन बड्या ठेकेदार थेट एकमेकांवर भिडल्याची घटना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या एका ठेकेदाराने चॉपर काढून दुसऱ्यावर चालविला परंतू दुसऱ्या मक्तेदाराने तो चुकविला अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली. या घटनेमुळे सर्वजनिक बांधकाम विभागात चांगलाच गोधळ उडाल्याचे पहायला मिळाले. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक असे की, रस्त्यांचा आणि बांधकामाचा ठेक्याची निवादा भरण्यावरून व ठेका घेण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात नेहमीच वाद होत असतात. त्यात आता पुन्हा मंगळ‌वारी १२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता हा वाद उफाळून आला व यावेळी तर थेट चॉपर काढण्यात आला. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यातील मक्ता मिळण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाद वाढत जाऊन मक्तेदार एकमेकांना भिडले. त्या वेळी एका मक्तेदाराने थेट चॉपर काढला व तो समोरील मक्तेदारावर चालविला. मात्र त्याने तो वार चुकविला. या प्रकारमुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व त्यांचे सहकारी तसेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसदेखील तेथे पोहचले. मात्र तोपर्यंत सर्वजण पसार झाले होते. या ठिकाणी वाद झाला अशी माहिती मिळाली, मात्र पोलिस पोहचले त्या वेळी तेथे कोणीही नव्हते व तशी तक्रारही नसल्याचे पोलिस निरीक्षक डॉ. जयस्वाल यांनी सांगितले.

वाद वाढत जाऊन नेमका काय प्रकार आहे, हे कोणाला समजत नव्हते. त्या वेळी तेथे काही जण जमा झाले. मात्र चॉपर निघाल्याने चांगलीच पळापळ झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात वाद झाला, मात्र नेमके कोण होते, शस्त्र निघाल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी फुटेजचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या परिसरात सीसीटीव्हीच नसल्याने काही माहिती मिळू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Protected Content