खडके चाळ व नामेदव नगरातील चार रिक्षांच्या चाकांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खडके चाळ आणि नामदेव नगर परीसरातील चार रिक्षांची चाके चोरून नेल्याची घटना शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या घटनेमुळे रिक्षाचालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरातील खडके चाळ व नामदेव नगर परिसरात शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मध्यरात्री २ ते ५ वाजेदरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी १०० मीटर अंतरात असलेल्या चार रिक्षांचे प्रत्येक दोन चाके काढून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत अफसर शेख सत्तार(वय-२४), प्रमोद मांडोळे (वय-३५), महेंद्र पाटील, शाहरुख शेख यांच्या (MH.19.CW.2194, MH.19.C.5558, MH.19.CW.2999, MH.19.V.5658 ) या रिक्षांचा समावेश आहे.

या घटनेत एका रिक्षा चालकाचे किमान ४ हजार ते ५ हजारपर्यत नुकसान झाले आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर काही रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती. यानंतर किशोर निकुंभ हे घटनास्थळी येवून काही परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी देखील करीत होते. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा जळगाव शहर पोलिसात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content