तरूणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा द्या; वंचित बहुजन महिला आघाडीचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका मुलीवर बलात्कार करून ठार मारणाऱ्या नराधमांना शिक्षा व्हावी आणि गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीसांनी सहआरोपी करण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा तालुक्यातील एका गावात राहणारी 20 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत तिला विष पाजून ठार मारणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या मामांनी ७ नोव्हेंबर रोजी पारोळा पोलीस स्थानकात घटनेची माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल न करता मुलीच्या मामाला पोलिसांनी अर्वाच्य भाषेत बोलून ‘अशा मुली घरातून निघून जातात] तू शोध सापडेल एखाद्या मुलासोबत’ असे सांगून तापमान करणाऱ्या पोलिसांना देखील सहआरोपी करावे, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

या आहेत मागण्या
अत्याचार प्रकरणात ३० दिवसात संशयित आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात यावा, गुन्हा जलदगती न्यायालयात चालू ठेवावा, दोन महिन्याच्या आत संशयीतांना कठोर शिक्षा व्हावी, मुलीच्या परिवाराला पुरेसे संरक्षण व आर्थिक मदत व्हावी, मुलीच्या परिवाराला मनोधैर्य योजनेचा व अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत लाभ मिळावा, जिल्ह्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिस स्टेशनच्या आवारात महिला पोलिस विभाग कार्यक्षम करावा गुन्हेगारी व रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीने व्यक्तींवर निरीक्षण ठेवावे आदी मागण्या करण्यात आल्या आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर यांनी दिली आहे. या निवेदनावर संघटनेच्या जिल्हा सचिव फिरोज शेख, महानगराध्यक्ष कविता सपकाळे, संगीता मोरे, प्रमोद इंगळे, डिगंबर सोनवणे, गणेश महाले, जितेंद्र केदार, अक्षय जोशी, पंचशिला आराख, अलका आराख, भरत ससाने यांच्यासह महिला व पदाधिकारी यांची स्वाक्षऱ्या आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1112383345883562/

Protected Content