फुले मार्केट परिसरातील रस्त्यावर दुकाने लावणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटच्या परिसरात असलेल्या रस्त्यांच्या मध्यभागी लावलेल्या हॉकर्स धारकांवर अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली असता हॉकर्सधारकांना दिवाळीच्या दिवसांपुरता दुकाने लावण्यासाठी मदत करावी यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संतोष वाहूळे यांच्याशी चर्चा करून दुकान लावण्यासाठी साकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुले मार्केट परिसरात किरकोळ विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई करण्यास सुरूवात केली. यावेळी फुले मार्केट परिसराच्या रस्त्यांवर किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. दरम्यान शहरातील मध्यवर्ती भाग आणि रहदारीचा रस्ता असल्याने या दुकानांमुळे वाहतूकीची कोंडी होत असून रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरमध्ये देखील लोटगाडीवर दुकाने लावण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाचे अधिकारी संतोष वाहुळे यांनी कारवाई करण्यास सुरूवात केल्यानंतर हाकर्स धारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान, मार्केट परिसरात लावलेल्या दुकानांवर कारवाई करतांना थोडा वाद निर्माण झाला. केवळ तीन ते चार दिवसांपुरता हे दुकाने लावू द्या अशी विनंती दुकानदारांनी केली. हा वाद थेट शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आला. हाकर्सधारकांवर कारवाई होण्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी साकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती अभिषेक पाटील यांनी दिली.

Protected Content