पुण्यात राज ठाकरे यांच्या सभेसाठी मैदानच मिळेना

BL05 RAJ THACKERAY

 

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नऊ ऑक्टोबरच्या सभेसाठी मैदानच मिळत नसल्याने पूर्वीप्रमाणे टिळक चौकातच सभा घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

 

रविवारी असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाल्यावर बुधवारी राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र, ठाकरे यांच्या सभेसाठी मध्य वस्तीतील मैदान उपलब्ध होत नसल्याची तक्रार मनसेने केली आहे. ठाकरे यांच्या सभेसाठी शहराच्या मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती; पण परवानगी नाकारण्यात आली आहे. कारण शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या संस्थांनी तुमच्या सभेसाठी जागा देता येणार नाही, असा पवित्रा घेतल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतील उमेदवार अजय शिंदे यांनी केला आहे. शैक्षणिक संस्थांची मैदाने उपलब्ध होत नसल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे करण्यात आली आहे. कोणतीच मैदाने उपलब्ध होत नसतील, तर पूर्वीप्रमाणे टिळक चौकाची जागा सभेसाठी देण्यात यावी, अशी विनंती मनसेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Protected Content