तीन मतदारसंघांमध्ये निवडणुका बॅलेट पेपरवर होण्याची शक्यता

vote

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील नांदेड, भोकरदन आणि पुण्यातील एका मतदारसंघात तब्बल प्रत्येकी १६० उमेदवार आहेत. जर आता कुणीही माघार घेतली नाही. तर इथे ईव्हीएमवर निवडणूक घेणे शक्य नसल्याने याठिकाणी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी आयोगाने तयारी सुरु केली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान , तीन मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी विरोधकांनीच ही खेळी खेळली असल्याचीही चर्चा आहे.

 

 

राज्यातील नांदेड, भोकरदन आणि पुण्यातील एका मतदारसंघात निवडणुका या ईव्हीएमऐवजी बॅलेटवर घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विरोधकांना ही दिलासादायक गोष्ट ठरु शकते. आता यामागचे नेमके कारण म्हणजे या तीनही मतदारसंघात तब्बल प्रत्येकी १६० उमेदवार आहेत. त्यामुळे इथे ईव्हीएमवर निवडणूक घेणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. अशावेळी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जाऊ शकते. यासाठी निवडणूक आयोगाने तशी तयारी देखील सुरु केली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांकडे दोन दिवस शिल्लक आहेत. अशावेळी जर काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले तर मात्र निवडणूक ही ईव्हीएमवरच होईल.पण जर अर्ज मागे घेण्यात आले नाहीत. तर निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात येतील. यामुळे आता या तीनही मतदारसंघात नेमके काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Protected Content