विरोधक सुरक्षादलांचे खच्चीकरण करीत आहेत – पंतप्रधान

narendra modi 1

पाटना (वृत्तसंस्था)। भारतीय हवाई दलानं ‘जैश-ए-मोहम्मद’च्या अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे आपल्याच देशातील विरोधक मागत आहेत. असे कृत्य करून काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सुरक्षा दलांचं खच्चीकरण करत आहेत, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी येथील जाहीर सभेत केला. दहशतवादाविरोधात एकजूट दाखवण्याची गरज असताना, दिल्लीत २१ पक्ष एनडीएविरोधात ठराव मांडत होते. देशातील नागरिक त्यांना माफ करणार नाहीत, असंही ते यावेळी म्हणाले.

आजघडीला आपली सुरक्षा दले देशात आणि सीमेपलीकडे कारवाई करून दहशतवाद नष्ट करत आहेत; त्याचवेळी देशातील काही लोक आपल्या सुरक्षा दलांचं खच्चीकरण करत आहेत, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाही थेट इशारा दिला. हा नवीन भारत आहे. आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. हा भारत गप्प बसणारा नाही, असंही ते म्हणाले.

‘गरीब आणि मध्यमवर्गीयांची कमाई लाटून आपलं दुकान चालवणारे चौकीदारामुळे त्रस्त आहेत. चौकीदारावर टीका करण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. पण हा चौकीदार सतर्क आहे,’ असंही मोदींनी सांगितले. एकत्र येऊन मोदींना संपवू असे ते म्हणत आहेत, पण आपण सर्व एकत्र येऊन दहशतवाद संपवू असं आमचं म्हणणं आहे. मी देशासाठी रस्ते तयार करत आहे, मात्र ते लोक मलाच रस्त्यातून हटवण्याचा कट रचत आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

Add Comment

Protected Content