चाळीसगाव शहरात तीन गायींची चोरी; पोलीसात गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । घरासमोर बांधलेल्या ४५ हजार रुपये किंमतीच्या तीन गायी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.  चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शांताराम पुंडलिक मराठे (वय-६० रा. खरजाई रोड ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दुग्धव्यवसाय करून कुटुंबाचे उदरनिर्वाह ते करीत असतात. मराठे यांच्या मुळ मालकीच्या व गावरान जातीच्या पाच गायी व एक कालवड आहेत. त्या गायींना घरच्याच अंगणात बांधलेले असतात. दरम्यान ६ जूलै रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मराठे यांनी गायीला चारापाणी करून झोपण्यासाठी घरात निघून गेला. सकाळी ७ वाजता मराठे हा गायींना चारापाणी करण्यासाठी घराबाहेर आला असता २० हजार रुपये किंमतीची लाल रंगाची गाय, १५ हजार रुपये किंमतीची भुरकट रंगाची गाय व १० हजार रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची कालवड एकूण ४५ हजार रुपये किंमतीच्या तीन गायी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मराठे यांनी आजपावेतो शोधाशोध केली असता वरील तिन्ही गायी ह्या मिळून आले नाही. कोणीतरी अज्ञाताने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने मराठे यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!