बंद घर फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिन्यांची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शांती नगर महिला कॉलेजजवळ एकाचे बंद घराचे कुलूप तोडून घरातून ३ लाख ३२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवर १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, भुसावळ शहरातील शांती नगर येथील महिला कॉलेजजवळ भगवान साहेबराव पाटील हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ३० मे रोजी रात्री १० वाजता भगवान पाटील हे घर बंद करून कामाच्या निमित्ताने निघून गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ३ लाख ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. बुधवारी १ मे रोजी सकाळी १० वाजता ते घरी आले तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर आत जावून पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे हे करीत आहे.

Protected Content