मध्यरात्री तरूणाच्या घरातून १२ हजार रूपयांची रोकड लाबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मलीक नगरात मध्यरात्री तरूणाच्या घराच्या मागच्या दरवाजातून प्रवेश करून १२ हजारांची रोकड चोरून नेल्याची रविवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी १ मे रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अल्ताफ फकीरा पटेल वय ३७ रा. मलिक नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी २८ मे रोजीच्या मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्याच्या घराच्या मागजच्या दरवाजातून आत प्रवेश करत घरातील पँटच्या खिश्यातून १२ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार सकाळी ९ वाजता समोर आला. त्यांनी पैशांबाबत सर्वत्र चौकशी केली. परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी दीड वाजता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवू तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहे.

Protected Content