बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा होणार आहे. बीडची निवडणूक वनसाईड झाली आहे. त्यामुळे माझा 100 टक्के विजय होणार, असा दावा बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीचे एक्सिट पोल समोर आले आहेत. यामध्ये भाजपला जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर झाल्याचे चित्र आहे. यावरूनच आज प्रसार माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी दावा केला आहे.
बजरंग सोनावणे म्हणाले, ”बीड जिल्ह्यातील निवडणूक ही विकासावरच झाली. मतदारसंघात जातीपातीची नुसती चर्चा झाली. महाराष्ट्राचा जो कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तोच कल बीड जिल्ह्यात सुद्धा आहे. हे पोल कसे करतात काय करतात याबाबत मला माहीत नाही. पण, मी बीड लोकसभा निवडणुकीतून शंभर टक्के निवडून येणार आहे”, असे सोनवणे म्हणाले.
पुढे बजरंग सोनवणे म्हणाले, ”मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाचा फायदा मला झाला असला तरी मला सगळ्या समाजाने मतदान केले. मनोज जरांगे पाटील यांनी कुणाला विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. मी या निवडणुकीत कोणत्याही नेत्याविरोधात वैयक्तिक आरोप केले नाहीत. पण माझ्यावर जे वैयक्तिक आरोप झाले त्याला मला उत्तर द्यावं लागेल तसेच वैयक्तिक आरोप प्रत्यारोप ऐकायला बरे वाटतात. त्यामुळे कुणालाही मते पडतात, असे अजिबात नाही. मी या निवडणुकीत उमेदवारी घेतल्यानंतर होणाऱ्या परिणामाचा विचार केला नाही. यापूर्वी सुद्धा माझ्यावर काय परिणाम झाला हे सगळ्यांना माहीत आहे. फक्त हे परिणाम अगदी घराच्या चुलीपर्यंत येऊ नयेत