गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

भुसावळ प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना परत त्याच्या गावी पाठविण्यासाठी शासनाने मोफत स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.

सध्या महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे अनेक लोकबाधीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे विविध राज्याततून, जिल्ह्यातून, शहरातून विविध क्षेत्रातली कामगार मजूर, कुटुंब, उद्योजक, आबाल वृद्ध, स्त्रिया, पुरुष ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी त्यांच्या आवश्यक कामानिमित्त आपल्या राज्यातील विविध जिल्हे, शहरात अडकून पडलेले आहेत. अशांना पुन्हा आपापल्या गावाच्या ठिकाणी परतण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच अशा सर्वांना आपापल्या घरी परत जाण्यासाठी आवश्यक अटी आणि नियमांची पूर्तता करून त्या-त्या ठिकाणच्या संबंधित नोडल अधिकार्‍यांकडे अर्ज करून जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या लॉकडाऊन मध्ये अडकलेले बरेचसे गोरगरीब मजूरमध्यमवर्गीय आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःचं वाहन नसल्याने ते सर्व यापासून वंचित राहणार आहेत. म्हणून महाशय आपण आपल्या जळगाव जिल्ह्यातील अशा सर्व वंचितांना, अडकलेल्यांना त्यांच्या शहर जिल्ह्यात राज्यात पाठविण्यासाठी शासनाकडून मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून द्यावीत. अशी विनंती व मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे.

Protected Content