जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तिघ्रे येथील शेतातील प्लॅन्ट मधून बांधकासाठी लागणारे आरएमसी प्लॅन्ट, चिलर प्लॅन्ट, जनरेटर, पॅनेल कंटेनर, तीन कॉम्प्यूटर सेट, ऑटो लेव्हल मशीन व इतर साहित्य असा एकुण १ कोटी ८१ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तिघ्रे शिवारातील एका शेतात बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. याठिकाणाहून बांधकामासाठी लागणारे साहित्य बांधकामासाठी पुरविले जाते. २८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास राहूल सुरेश धांडे वय ४० रा. कोल्हे नगर, जळगाव याने बांधकामाच्या प्लॅन्टमधून आरएमसी प्लॅन्ट, चिलर प्लॅन्ट, पॅनेल कंटेनर, पावर जनरेटर, तीन कॉम्प्यूटर सेट, सहा ऑटेा लेव्हल मशीन व इतर साहित्य असा एकुण १ कोटी ८१ लाख रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील सुपरवायझर रंजन प्रसाद रा. भुसावळ यांनी नशिराबाद पोलीसात धाव घेवून राहूल धांडे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता राहूल सुरेश धांडे याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.