बीएएमएस आर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी | शासकीय सेवेत बीएएमएस असो की एमबीबीएस आर्हताधारक वैद्यकीय अधिकारी या दोघांच्याही कामाच स्वरुप समानच असल्याने बीएएमएस आर्हताधारक कंत्रांटी तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ यांच्या मासिक मानधन वाढ करण्यात यावी अशी मागणी तदर्थ वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने आरोग्य मंत्री रोजेश टोपे यांना ईमेलव्दारे निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की वास्तविक पाहता समान काम समान वेतन देण अपेक्षित आहे. परंतु सुधारीत मानधन वाढीत सरकारने बी.ए.एम.एस. आर्हताधारक तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट- अ यांच्या मानधनात काहीही वाढ दिलेली नसल्याने महाराष्ट्रातील सर्व बी.ए.एम.एस.तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात अन्याय झाल्याची भावना असुन असंतोष निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय सेवेतील भवितव्याची कुठलीही शास्वती नसतांना कर्तव्याची जाण ठेऊन आम्ही कोराना सारख्या साथउद्रेकात जीव धोक्यात घालुन काम करत आहेत. त्यामुळे राज्यसरकार ने बीएएमएस कंत्रांटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्याकरीता मानधनात वाढ करुन त्यासोबतच पुढील सेवेचा बॉण्ड देखील रीन्युव्ह करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल आताच उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर तदर्थ वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संस्था/ संघटना संस्थापक तथा राज्याध्यक्ष, डॉ.अभिषेक प्रमोद ठाकुर, संस्थापक उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय साळुंखे आदींच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content