अरे देवा : आज जिल्ह्यात ३८ पॉझिटीव्ह; बाधीतांचा आकडा आठशेवर !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज एकूण ३८ नवीन कोरोना बाधीत आढळून आले असून यामुळे रूग्णांचा आकडा आठशेवर गेला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनाबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात ३८ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १८ रूग्ण भुसावळ शहरात आढळून आले आहेत. या पाठोपाठ रावेर १०; जळगाव शहर ३; मुक्ताईनगर २; एरंडोल, जामनेर, जळगाव ग्रामीण, भडगाव, चोपडा प्रत्येकी एक असे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आजच्या रिपोर्टमुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आठशेवर पोहचली आहे.

Protected Content