चोपडा फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई- सेमिनारचे आयोजन

 

चोपडा, प्रतिनिधी | येथील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी च्या फार्मासुटिक्स विभागाकडुन  शुक्रवार दि. ५ जुन रोजी करंट सिनरिओ ऑफ ग्लोबल फार्मा बिझिनेस डेवलपमेंट या विषयावर आंतरराष्ट्रीय ई- सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

कोविड-१९ नंतर घडत असलेल्या बदलाचे फार्मा बिझिनेस वर होणारे परिणाम काय असतील या बद्दल दुबई येथील मायलान कंपनीचे पियुष जैन हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या ई-सेमिनार करीता आतापर्यंत देश-विदेशातील २०० लोकांची नोंदणी झाली असल्याची माहिती सेमिनार चे समन्वयक डॉ. भरत जैन यांनी दिली. ई-सेमिनार च्या यशस्वी करीता फार्मासुटिक्स विभागातील सर्व प्राध्यापक, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्रयत्न करीत आहेत. आंतरराष्ट्रीय ई- सेमिनार करीता महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content