संतोषी मातानगरातील जि. प. शाळेत वृक्षदिंडी उत्साहात

jamner 3

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । येथील संतोषीमाता नगरातील जि.प.प्राथमिक शाळेत नुकतीच वृक्षदिंडी व पालकसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सुरुवातीला शाळेच्या परिसरात टाळ-मृदुंग वाजवत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ घोषनामाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी स्वत: मृदुंग वाजविले. पालखीची उत्कृष्ट सजावट व विद्यार्थ्यांचा आकर्षक असा पोशाख व प्रत्येक मुलाच्या डोक्यातील टोपी यामुळे वृक्षदिंडी लक्षवेधी ठरली होते.
वृक्षदिंडी नंतर पालकसभा मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यांनी उपस्थित पालकांना विद्यार्थी लाभाच्या योजना संदर्भात, कागदपत्रकांची करावयाची पुर्तता तसेच विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकवणेबाबत व शैक्षणिक गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी सुभाष कुंभार यांची जामनेर येथे नायब तहसिलदारपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प देवून करण्यात आला. याप्रसंगी, मा. सरपंच तथा मा.जि.प.कृषी सभापती प्रदिप लोढा, मा.पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, पहूरपेठ सरपंचपती रामेश्वर पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या बाबतीत व शैक्षणिक गुणवत्ता वाढीबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

कार्यक्रम प्रसंगी भारतीय जीवन बिमा निगमचे विकास अधिकारी संजय देवरे यांनी बिमा स्कुल संदर्भात पालकांना सविस्तर माहिती देवून विद्यार्थ्यांचा बिमा उतरवण्याचे आवाह केले. ग्रामपंचायततर्फे शाळेला वृक्षरोपणासाठी दिलेल्या वृक्षांचे वाटप पालकांना करण्यात आले. पालकसभेनंतर शालेय आवारात वृक्षारोपण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपसरपंच श्याम सावळे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निर्गुणा महाजन, सदस्य राजेंद्र धुळसंधीर, फिरोज तडवी, शरद बेलपत्रे, भारत पाटील, संजय पांढरे, कैलास जाधव, विनोद पांढरे, काशिनाथ चव्हाण, संतोष बनकर, तुकाराम नवघरे, शिवाजी पाटील, ज्योती भिवसने पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षदिंडी व पालक सभा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सुवर्णा मोरे, चित्रलेखा राजपुत,
दिनेश गाडे, रत्नमाला काथार, रोहिणी शिंदे, मनिषा राऊत व शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content