त्रिविक्रम महाराज मंदिरात आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक पूजा

जामनेर/शेंदुर्णी -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या व असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या श्री. त्रिविक्रम मंदिरात आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

खान्देशचे प्रति पंढरपुर शेंदुर्णी नगरीत भगवान श्री.त्रिविक्रम महाराज यांची आषाढी एकादशीला माजी मंत्री आ. गिरिश महाजन व त्यांच्या सौभाग्यवती तथा जामनेरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते मध्यरात्रीच्या सुमारास अभिषेक करून पुजा करण्यात आली.
पूजा झाल्यानंतर बोलतांना आ. गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे कल्याणकारी सरकार आले आहे. यंदा पाऊस सुद्धा आपल्या परिसरात समाधानकारक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हा सुखी समाधानी व्हावा, यंदा शेतात मोठ्या प्रमाणावर पिक यावे,सर्वांना सुख समाधान लाभावे अशी भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना केली. भगवान श्री.त्रिविक्रम महाराजांचे तीन प्रहरात दर्शन घेतले तर साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे पुण्य लाभते. दर्शनासाठी लाखो भाविक शेंदुर्णीत येत असतात. येथे भाविकांच्या दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. . यावेळी त्यांच्यासोबत शेंदुर्णीच्या नगराध्यक्ष, भाजपचे नेते गोविंद अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Protected Content