पैशांसाठी विवाहितेचा छळ : पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एक लाख रूपयांसाठी विवाहितेचा छळ करणारा पती आणि तिच्या सासरच्या एकूण सात जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगरातील रहिवासी असणार्‍या ३० वर्षे वयाच्या विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केला. सोन्याची अंगठी व तसेच दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणून १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ दरम्यान छळ केला.

या प्रकरणी सदर विवाहितेने बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. यानुसार तिचा पती जावेद खान इक्बाल खान, सासू मुमताज बी. इक्बाल खान, नणंद तबस्सूम बी. इम्रान खान, नणंद मैनाज इक्बाल खान, जेठानी रिहाना मुस्ताक खान, जेठ मुस्ताक इक्बाल खान, भाची अरसीन सलीम खान (सर्व रा.खडका, ता.भुसावळ) यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश एकनाथ चौधरी करत आहेत.

Protected Content