बचपन व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलतर्फे अमृत महोत्सवनिमित्त रॅली

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नामांकित संस्था गुरुकुल प्रतिष्ठान संचलित- बचपन प्ले स्कूल आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल एरंडोल जि. जळगाव या शाळेतर्फे शहरातून ” घर घर तिरंगा, हर घर तिरंगा” “आझादी का अमृत महोत्सव ” निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त या रॅलीत दर्शनी भागाला लांब असा तिरंगा फडकत होता.तसेच सजीव देखाव्यात भारत माता, स्वातंत्र्य वीर यांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. व तसेच यानिमित्ताने हर घर तिरंगा लावावा याकरीता जनमानसात प्रेरणा व प्रबोधन व्हावे, यासाठी प्रमोद पाटील सर यांच्या संकल्पनेतून ७० फुट लांबीचा तिरंगा बनवण्यात आला होता. हे रॅलीचे मुख्य आकर्षन ठरले. तसेच शहरातील चौकाचौकात शाळेच्या मुला-मुलींनी, स्वातंत्र्य संग्रामात जीवाचे बलिदान दिलेल्या विर हुतात्म्यांच्या जीवनावरील हुबेहुब वेषात पथनाट्य व संदेशपर गीते सादर करण्यात आले.
राष्ट्र देशभक्तीपर गीतांनी व जयघोषणांनी एरंडोल शहर व परिसर दुमदुमून निघाला होता अवघ्या शहरात तिरंगामय वातावरण निर्माण झाले. या रॅलीतून दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज लावण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रेरणास्थान प्रा. प्रमोद पाटील सर व शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा.सौ सुरेखा पाटील मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालकांची यावेळी मोठी उपस्थिती लाभली होती.

Protected Content