भुसावळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात पाच तर तालुक्यावासियांसाठी दोन कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी उपाययोजनासाठी भुसावळात बैठक घेतली.

उपाययोजना व समास्या जाणून घेतल्या
भुसावळातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८५ इतकी झाली आहे. मयत रुग्णांची संख्या २४ वर पोहचली आहे. ही संख्या कशी कमी करता येईल यासाठी शहरातील खाजगी डॉक्टर, नगरपरिषदेचे डॉक्टर, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, महसूल कर्मचारी तसेच सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कोरोना प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यासाठी सूचना दिल्या. बैठकीत आलेल्याकडून काय उपाय योजना करता येईल यांची माहिती जाणून घेतली. ती माहिती लवकरच अंमलात आणली जाईल असेही आश्वासन दिले.

कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना पिण्याचे पाणी, जेवणाची व्यवस्था वेळेवर केली जात नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या परिसराला १२ तासात सील करण्यात यावे. आधी ५ किलोमीटर, ३ किलोमीटर अशा प्रकारे परिसर सील करण्यात येत असे आता ज्या भागात रुग्ण बाधित आढळून आला. त्या भागातील गल्लीला किंवा इमारतीला सील करण्यात येत आहे. त्या घरातील व्यक्तींना कॉरंटाईन करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे मोठे घर असल्यास तो व्यक्ती त्या ठिकाणी कॉरंटाईन होऊ शकतो असे शासनाने परिपत्रक काढले आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर केव्हिड सेंटरला लावण्याच्या सूचनाही दिल्या आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप जिल्ह्याधिकाऱ्यांनी केला.

सुचनाचे पालन न केल्यास कारवाई होणार- जिल्हाधिकारी
जर सूचनांचे पालन होत नसेल तर गय केली जाणार नाही, जर कठोर कारवाई केली जाणार असल्याचीही माहिती दिली. तसेच बाजार नेहमी प्रमाणे सुरू करण्यात आला असून खरेदी करण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर असे कुठलेही वापर न करता फिरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याला थांबविण्यासाठी आपणच काळजी घेणे गरजेचे आहे. शहरात बिना मास्क फिरत असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मेडिकल व जिवनावश्यक वगळता सर्व बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नगरपरिषदेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहे. पान टपरी बंद ठेवण्यात आलेली आहे. वातानुकूलित मॉल, किराणा शॉपी यामध्ये पाचपेक्षा जास्त कर्मचारी व ग्राहकाची ये-जा असेल अशांना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. चहा, सलून दुकानांनाही बंद ठेवण्यात आले असून पर्यायी व्यवसाय करण्याचे सांगण्यात आले आहे.

सर्व पक्षीय बैठकीत आमदार संजय सावकारे यांनी शहरातील दुकाने एक दिवस कापड दुकान, दुसऱ्या दिवशी किराणा दुकान असे दिवस ठरवून सुरू ठेवण्यात येण्याचे पॅटनचा भुसावळकरांनी अंमलात आणली पाहिजे. तर माजी आमदार संतोष चौधरी यांनी शहराची दोन भागात विभागणी करण्याचे सांगितले सील करण्यात आलेल्या भागामध्ये प्रशासनाव्दारे पुरवठा करण्यात यावा. त्या भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा मागणी प्रमाणे पूर्ण ४ ते ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून मोबाईल नंबर देण्यात यावा. शेवटी भुसावळकरांना सर्वात मोठा प्रश्न भेळसावणार तो पाण्याचा असून शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन धांडे यांनी केला.

लवकरच भुसावळातील जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे अनेक विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पण बाजारपेठ पोलीस स्टेशनला पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी मिळून आल्याने त्या विषयाकडे जिल्ह्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. एकीकडे म्हणतात की ज्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले त्या परिसराला १२ तासात सील करावे. मग बाजारपेठ पोलीस स्टेशनला कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर का सील करण्यात आले नाही कदाचित १२ तास झाले नसल्यामुळे ते सुरू दिसत आहे. आज रोजी पुन्हा नवीन पोलीस कर्मचारी पॉझिटीव्ह आढळून आल्याने भीती कमी न होता ती वाढत असल्याचे दिसत आहे. बैठकीत पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी मैनव्रत का धरले होते कोरोना योद्धा पोलीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाजू का नाही मांडल्या? या कर्मचाऱ्यांच्या भेटी का नाही घेतल्या? आजरोजी या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याची आवश्यकता आहे.कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याने पोलीस स्टेशनला काम करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Protected Content