व्यंकटेश नगरात कोवीड लसीकरण शिबीराला प्रतिसाद

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील व्यंकटेश नगरात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व वाय.आर.जी. केअर यांच्या संयुक्त विद्यामानाने मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कोवीड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. या अनुषंगाने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व वाय.आर.जी केअरच्या वतीने अमृत महोत्सव कोव्हॅक्सीन आणि कोवीशील्ड लसीकरण शिबिर स्व. शांताबाई बाबुराव पाटील सभागृह व्यंकटेश कॉलनीत मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत संपन्न झालेल्या या शिबिरास उदंड असा प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, नगरसेवक नितीन बरडे, नगरसेवक बंटी जोशी, मराठा सेवा संघाचे राम पवार यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, वैशाली झाल्टे, संगीता चौधरी, नूतन तासखेडकर, भाग्यश्री महाजन, नेहा जगताप, किमया पाटील, योगिता बाविस्कर, योगिता ठाकूर, सुनिता पांडव या उपस्थित होत्या. शिबिरास ज्योती राणे, रेणुका हिंगू, भारती कापडणीस शशी शर्मा यांचे सहकार्य लाभले.

Protected Content