एका मिनिटात कोरोना सांगणारे तंत्र यशाच्या मार्गावर !

 

नवी दिल्ली:वृत्तसंस्था । भारत आणि इस्रायल संयुक्तपणे कोरोना विषाणूची चुकटीसरशी चाचणी करण्याचे तंत्रज्ञान तयार करत असून ते आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही दिवसातच हे किट तयार होणार आहे. एका मिनिटाहूनही कमी वेळेत कोरोनाचा रिपोर्ट मिळणार आहे.

भारतातील इस्रायलचे राजदूत रॉन माल्का यानी एका मुलाखतीत ही माहिती दिली भारत आणि इस्रायल या दोन देशांमध्ये चांगल्या संबंधांसाठी आरोग्यसेवा हे महत्त्वाचे क्षेत्र असणार आहे.

ज्या व्यक्तीची चाचणी करायचे आहे त्या व्यक्तीने नळीत फक्त तोंडाने हवा फुंकायची आहे. यामुळे ३० सेकंद, ४० सेकंद आणि ५० सेकंदात चाचणीचा रिपोर्ट प्राप्त होणार आहे, ही टेक्नॉलॉजी एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी वापरण्यात येणार आहे . या व्यतिरिक्त या किटच्या निर्मितीसाठी पैसा देखील अतिशय कमी लागणार आहे. कारण या चाचणीच्या रिपोर्टसाठी नमुना लॅबमध्ये पाठवण्याची आवश्यकता नसते. तेथल्या तेथेच रिपोर्ट प्राप्त होणे हेच या किटचे वैशिष्ट्य आहे.

भारत आणि इस्रायलने संयुक्तपणे ४ चाचणी तंत्रज्ञानाची ट्रायल घेतलेली आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर या चाचणीसाठी नमुने गोळा करण्यात आले. या तंत्रामध्ये ब्रेथ अॅनलायझर आणि ध्वनी चाचणीचा देखील समावेश आहे.

Protected Content