सावदा येथील दाम्पत्य कोरोना पॉझिटीव्ह

शेअर करा !

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सावदा शहरातील एक खासगी डॉक्टर आणि त्यांची सौभाग्यवती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आज सकाळी आलेल्या रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.

store advt

याबाबत वृत्त असे की, शहरातील एक खासगी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. याला प्रशासनाने दुजोरा दिला असून त्यांच्या रहिवासाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा परिसर सील करण्यात येणार असून परिसरात फवारणीसह अन्य उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

दरम्यान, या दोन्ही कोरोना बाधीतांमुळे शहरातील एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ६० झाली असून यापैकी नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!