महिला पोलीसांनी सांभाळला एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कारभार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिला. पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल निलोफर सैय्यद यांनी कामकाज पहिल्याचे दिसून आले. शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महिलांनी पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळल्याचे पहायला मिळाले.

देशभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. या अनुषंगाने विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी जागतिक महिला दिनानिमित्ता सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कारभार यशस्वीरित्या सांभाळला. यात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल निलोफर सैय्यद काम पाहिले. त्यांच्यासोबत महिला हेड कॉन्स्टेबल अनिता तडवी यांनी दुय्यम अधिकारी म्हणून तर महिला पोहेकॉ यांनी ठाणे अंमलदार म्हणून काम पाहिले. त्यांच्या सोबतीला महिला हेड कॉन्स्टेबल सुनिता तेली, सपना येरगुंटला, हसीना तडवी यांनी काम पाहिले. पोलीस स्टेशनची साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचारी लिलाबाई मस्के, निर्मलाबाई तायडे, बनाबाई जाधव यांचा देखील सत्कार करण्यात आल्याचे पहायला मिळाले.

Protected Content