बोढरेत जिल्ह्यातील पहिले घरांची वसाहत बनणार

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बोढरे येथे मोदी आवास योजनेंतर्गत तब्बल २५९ घरांची वसाहत बनणार आहे. याचे भुमिपूजन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले असून जिल्ह्यातील हे पहिले वसाहत असणार आहे.

मोदी आवास योजनेअंतर्गत व आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून, जिल्हा ग्रामीण यंत्रणा यांच्यामार्फत तालुक्यातील बोढरे या गावातील दस्तोरी फाट्याजवळील गावठाण या जागेवर तब्बल २५९ घरांची वसाहत बनणार आहे. या जागेचे भूमिपूजन काल रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर आमदार मंगेश दादा चव्हाण व गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान सर्व सोयीसुविधा युक्त सुसज्ज असा आदर्श वसाहत येत्या दहा महिन्यात उभे करण्याचे संकल्प यावेळी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी केले आहे.

यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, जे मला जमले नाही ते मंगेश दादांनी करून दाखविले आहे. म्हणून मी आता जरी धावती भेट देत असेल तरी मंगेश दादांनी हि वसाहत एका वर्षाच्या आत उभी करण्याचे संकल्प केले आहे. त्यावेळी लोकार्पणाला माझी उपस्थिती असेल असे आश्वस्त करून नवीन होणाऱ्या वसाहतीला शुभेच्छा दिल्या.

तदनंतर काही लाभार्थ्यांना गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या हस्ते मंजूरीचे पत्र देण्यात आले. दरम्यान हे अभिनव प्रकल्प भविष्यात महाराष्ट्रातील बंजारा तांड्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असा प्रयोग ठरेल, असे नंदकुमार वाळेकर यांनी आशावाद व्यक्त केला. दरम्यान भटक्या विमुक्त जमातीचा मोदी आवास योजनेत समाविष्ट करण्याबाबत मोलाचे कायदेशीर मार्गदर्शन केल्याबद्दल नंदकुमार वाळेकर यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानून त्यांचा सन्मान करण्यात आले.

याप्रसंगी कृ.उ‌.बा.समितीचे उपसभापती साहेबराव राठोड, मा.प.स.सभापती संजू तात्या पाटील, प्रभाकर जाधव, ग्रामसेवक सतिश बंडकर, सामाजिक कार्यकर्ते पुनमचंद जाधव, विकासो दिनकर राठोड, नमो ताई राठोड, अमोल चव्हाण (सरचिटणीस भाजपा), राम पाटील (उपाध्यक्ष भाजपा), सरपंच गोरख राठोड (जुनोने), सरपंच शास्त्रीजी (डामरून), सामाजिक कार्यकर्ते संतोष राठोड, माजी सरपंच संतोष राठोड, सरपंच बळीराम चव्हाण (सेवानगर), सरपंच मगर मुखेड, सरपंच रामदास राठोड, सरपंच बळीराम चव्हाण, सरपंच भरत चव्हाण (आंबेहोळ), विनीत राठोड, अविनाश चव्हाण, गोरख राठोड, गुलाब राठोड, विस्तार अधिकारी आर आय पाटील, बोरसे आप्पा विस्तार अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष येवले यांच्यासह बोढरे ग्रामपंचायतीचे सरपंच सविता राठोड, सर्व सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content