केंद्रीय महाविद्यालय सुरु करा – खासदार प्रतापराव जाधवांची मागणी  

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज दिल्ली येथे केंद्रीय शिक्षा राज्यमंत्री ना.अन्नपूर्णा देवी यांची खासदार प्रतापराव जाधव यांनी भेट घेवून बुलडाणा जिल्ह्यात येत्या शैक्षणिक वर्षाच्या सत्रामध्ये शासकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी मागणी केली.

बुलडाणा जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुख सुविधा नसल्यामुळे जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय असावे अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव त्यांच्या मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री यांनी २२ मे २०१८ रोजी एका आदेशान्वये बुलडाणा येथे शासकीय महाविद्यालयासाठी निरीक्षणाकरिता संचालक वैद्यकीय संशोधन व शिक्षण विभाग, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांच्या अंतर्गत एक समिती गठीत केली होती या समितीने बुलडाण्याला ८ जून २०१८ रोजी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून अहवाल शासनाकडे सादर केला होता.

हे महाविद्यालयात सुरु करण्याकरिता केंद्रीय शिक्षा राज्यमंत्री ना.अन्नपूर्णा देवी मागील अनेक वर्षीचा पाठपुरावा करून महाविद्यालय सुरू करण्यात कटिबद्ध आहे. असे आश्वासन देण्यात आले.

Protected Content