जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; १० मीमी पावसाची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्या दोन दिवसांपासून मान्सूनचे बर्‍यापैकी पुनरागमन जोरदारपणे झाले असून जिल्ह्याभरात मंगळवारी १०.३ मि.मी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जुलै महिन्यात सरासरी १८९.२ मि.मी पावसाचा अंदाज असून मंगळवार ५ जुलै रोजी जळगाव तालुक्यात ४५.१, भुसावळ ११.५, यावल ४.९, रावेर ७.८, मुक्ताईनगर ११.०, अमळनेर ०.४, चोपडा ०.७, एरंडोल १६.४, पारोळा ३.३, चाळीसगाव ४.०, जामनेर १७.०, पाचोरा ३.९, भडगांव ५.५, धरणगांव २०.३ आणि बोदवड ४.३ मि.मी अशी एकूण १०.३ मि.मी पावसाची नोंद विविध तालुकास्तरावरील महसूल व कृषि विभागात झाली आहे. तर आतापर्यत २०.३ मि.मी पाऊस झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

सोमवारी जिल्हाभरात ढगाळ वातावरणासह शहरात सकाळी रिमझिम तर सायंकाळी ७ वाजेनंतर दमदार हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान दिसून येत असून अंकूरलेल्या खरीप पिकांच्या रोपांना जिवदान मिळाल्याचे बोलले जात आहे.

Protected Content