पंकज विद्यालयात ‘प्लास्टिक पिशव्या संकलन’

pankaj school

 

चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज विद्यालयातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपल्या घरातील व परिसरातील अनावश्यक प्लॉस्टिक पिशव्या संकलन करून त्याची आज विभागणी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्यानुसार विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक पिशव्या सोबत आणलेल्या असून त्या प्लॉस्टिक पिशव्याची कचरा गाडीतर्फे योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी प्लास्टिक पिशव्या पर्यावरणमध्ये कसा धोका निर्माण करते? याची माहिती विद्यार्थ्यांना अनिल पाटील यांनी सांगितली. तसेच सदरील धोका टाळण्यासाठी आपण विविध ठिकाणी कापडी व कागदी पिशव्या वापराव्यात आणि आपल्या परिसरातील नागरिकांना अशा पिशव्या वापरण्यास सांगावे असे आवाहन बालमित्रांना विद्यालयातर्फे मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील यांनी केले आहे. तसेच विद्यालयातील शिक्षिका गायत्री शिंदे यांनी रांगोळीतून ‘प्लॉस्टिक मुक्ति करुया’ असा संदेश देण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content