अ.भा.युवा कोळी समाज दिल्लीच्या महाराष्ट्र सदस्यपदी कैलास कोळी

मुक्ताईनगर प्रतिनिधी | अखिल भारतीय युवा कोळी समाज नई दिल्ली शाखा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद भांडे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील कैलास कोळी यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती केली आहे

अखिल भारतीय कोळी समाज, राष्ट्रीय अध्यक्ष खेमचंद कोळी व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संजु शिरसाठ, डॉ.राजेंद्र सावळे यांच्याशी विचारविनिमय करून संस्थेच्या प्रती असलेला विश्वास व भूमिका पाहून दि.27 नोव्हेंबर रोजी हि नियुक्ती नियुक्ती करण्यात आली.

“समाज संघटित करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहतील या अपेक्षेसह माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी सभापती दशरथ कांडेलकर, माजी सभापती चंद्रकांत भोलाणे, जि प सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच कवरसिंग पिडोदकर, भगवान भोलाणे, शिवाजी पाटील, ज्ञानदेव माडोकार, ग्रा प सदस्य लहु घुळे, सूर्यकांत पाटील, प्रमोद कोळी सरपंच, शेषराव कांडेलकर मा सरपंच, गुणवंत पिवटे, संदीप खिरोडकर, अभिमन्यू इंगळे व सुपडा मोरे यांनी कोळी यांचे अभिनंदन केले

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!