पाचोऱ्यातील सु.भा.पाटील विद्यालयात दहीहंडी उत्साहात (व्हीडीओ)

583d6fdf 7266 4e4d b1b4 9626008941bc

 

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील सु.भा.पाटील विद्यालयात आज दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘ढोल ताशाच्या गजरात दांडिया खेळत मुबंईच्या गोविंदा पथकाप्रमाणेच दहीहंडीचा थरार सादर केला.

 

आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दिवसभर राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र, यंदा सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी करण्यात येत आहे. पाचोऱ्यात दरवर्षी हंड्या फोडण्यासाठी विविध मंडळाच्या तरुणांमध्ये चुरस असते. मात्र, आज पाचोऱ्यात व्ही.पी रोडवरील सु.भा. पाटील विद्यालयात इयत्ता १ ली ते ४ थीच्या बालगोपालसाठी आज सकाळी ९ वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आयोजित करण्यात आला होता.

 

बालगोपालाचा या दही हंडी उत्साहात शाळेतील सर्व विद्यार्थीना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या मार्गदर्शनानुसार दही हंडी फोडण्यात आली. यावेळी मुख्यध्यपक नारायण सोनवणे, कविता पाटील, रूपाली पाटील, सुरेखा पाटील, पल्लवी मॅडम, सीमा मॅडम, संतोष पवार, आशिष पाटील, महेश लोखंडे, योगेश सोनवणे, अभिजित महालपुरे, राकेश पाटील यांनी परिश्रम घेतले. यानंतर गोपाल काल्याचे प्रसाद वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदचे वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

 

Protected Content