चोपडा येथे लालबावटा शेतमजूर युनियन बैठक

lal bavata

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लालबावटा शेतमजूर युनियनची बैठक दि. 23 ऑगस्ट रोजी धनगर समाज मंदिरात घेण्यात आली असून शेतमजुरांनी 10 मागण्यांचे निवेदन येथील नायब तहसिलदार यांना दिले.

याबाबत माहिती अशी की, मोदी सरकारचे काळात शेतमजुरांकडे दूर्लक्ष होत असल्यामुळे शेतमजूरांनी संघटीत होणे गरजेचे आहे. या बैठकित सोनभद्र येथे 10 शेतमजूरांची हत्या करण्यात आली. त्याचा व जम्मू आणि काश्मीरमध्ये जनतेचे मत विचारात न घेता 370 व 35 अ कलम रद्द करण्यात आले. याचा निषेध करण्यात आला. आणि ज्यांना काश्मीर राज्यातील स्थिती तेथील झेंडा 370कलमची पार्श्वभूमी माहीत नाही. अशांसह मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत हा निर्णय म्हणजे भारतीय संविधानाची पायमल्ली होय. या काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.डी.राजा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे राष्ट्रीय सचिव डॉ.सिताराम येचूरी यांना जम्मूत पक्षाची मिटींग घेणेस मज्जाव केला. केंद्र सरकारच्या या कृतीचाही निषेध करण्यात आला.

या बैठीकीच्या अध्यक्षस्थानी कॉ.लक्ष्मण शिंदे हे होते. तर भारतीय शेतमजुर युनियनचे राष्ट्रीय कमेटी सभासद अमृत महाजन, युनियन जिल्हा सचिव गोरख वानखेडे, खजीनदार निंबाजी बोरसे व किसानसभा हातेडचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या बैठकनंतर नायब तहसिलदार श्री पंजे यांना या निषेधासह शेतमजूरांच्या 10 मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून येत्या 28‍ ऑगस्ट रोजी शेतमजूर आदीवासी बांधकाम मजूरांचे प्रश्न सोडवा, नविन विज मीटर ग्राहकांची लूट थांबवता, आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. मागण्यांपुर्ण न झाल्यास तहसिलदार कार्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. त्यावेळी शेतमजूर यूनियनचे 14 गावातील प्रमूख पदाधिकारी वासूदेव कोळी, जिजाबाई राजपूत, राजेंद्र पाटील, रतिलाल भिल, मंगल भिल अरमान.तडवी आणि आदि उपस्थित होते.

Protected Content