दिंडीत जेसीबी घुसला; नामदेव महाराजांच्या १७ व्या वंशजासह २ वारकरी ठार

Accident

 

पुणे (वृत्तसंस्था) दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचेही निधन झाले आहे.

 

प्रत्यक्षदर्शिच्या माहिती नुसार सर्व वारकरी चहापानासाठी एका ठिकाणी थांबले होते. तेथून काही अंतरावर एक जेसीबी होती. जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती समजल्यानंतर चालकाला उतारावरून वाहन आणू नका अशी विनंती करण्यात आली. परंतु अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी सुरू केला. उतारावरून येत असताना त्याने आधी एका रिक्षाला धडक दिली आणि त्यानंतर काही वारकरी हे जेसीबी खाली आले. या अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला असून अतुल महादेलव आळशी (२४) असे दुसऱ्या मृत पावलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. या भीषण अपघातात अपघातात १५ वारकरी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, जखमींवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Protected Content