कासोदा येथील विविध समस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कासोदा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना गावातील मुख्य समस्यांचे लेखी निवेदन सादर केले.

सविस्तर वृत्त असे की, ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर सर्वच शाळेना संरक्षक भिंत बांधणे कामी कासोद्यात सर्व प्रथम कामाचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी साप्ताहिक विचार वैभव वृत्तपत्राच्या टीमने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांना लेखी निवेदन दिले.

निवेदनात कासोदा येथील लोकसंख्या ३५ हजाराच्यावर व भल्यामोठ्या बाजारपेठेचे गाव असूनही बसस्टॉप नाही , कासोदा व परिसरातील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी, गावातील व परिसरातील ग्रामस्थ कासोदा येथे जा-ये करतात. परंतु कासोद्यात बसस्थानक नाही, येवढ्या मोठ्या गावाच्या पोलीस स्टेशनला संरक्षण भीत, पोलीस कर्मचारी यांना राहण्यासाठी पो.स्टे.च्या आवारात एकही पोलीस क्वॉटर नाही. कासोदा हे गाव हिंदू – मुस्लिम गाव असून अनावधानाने काही घटना घडली त्याचे पडसाद जर वाईट घडले.

जमाव पोलिस स्टेशनवर चालून आला तर पोलिस स्वतःचे देखील रक्षण करू शकतील म्हणून कासोदा पोलीस स्टेशनला संरक्षण भिंत व मोठे गेट लावण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व साप्ताहिक विचार वैभव वृत्तपत्राच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले. त्याप्रसंगी एरंडोल ता.अध्यक्ष सागर शेलार, पत्रकार राहुल मराठे, पत्रकार वासुदेव वारे, पत्रकार संघाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content