आदीवासी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मासुम तडवी यांचा सत्कार

यावल,प्रतिनिधी | आदीवासी प्रकल्प समीतीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते मासुम रहेमान तडवी यांची कॉंग्रेस कमेटीच्या वतीने सत्कार करण्यात आले.

आदीवासी प्रकल्प समीतीच्या नवनियुक्त सदस्यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते मासुम रहेमान तडवी यांची नियुक्ती झाल्याने ‌आयोजित आढावा बैठकीत त्यांचा सत्कार कॉंग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमास युवा कार्यकर्ते धनंजय शिरीष चौधरी , यावल पंचायत समितीचे गटनेते तथा यावल तालुका संजय गांधी समितीचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील , जळगाव जिल्हा युवक काँगेसचे अध्यक्ष हितेश पाटील , काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल , कॉग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, वढोदे सरपंच संदीप सोनवणे , दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, काँग्रेस आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर परमान तडवी, बोरखेडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुपडु इमाम तडवी, वड्रीचे आदीवासी सामाजीक कार्यकर्ते इमाम तडवी , अय्युब तडवी आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते .

Protected Content