विद्यापीठ कायद्याविरोधात धरणगाव भाजप युवा मोर्चाचे निदर्शने

धरणगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल केले आहे. यामुळे विद्यापीठांचे राजकिय हस्तक्षेप थांबविण्यासाठी धरणगाव तालुका भाजपा युवा मोर्चा यांनी तीव्र आंदोलन केले.

राज्य सरकारने घाईघाईने विद्यापीठ कायद्यात काही बदल केले, या बदलानुसार आता प्रत्येक विद्यापीठावर प्रकुलपती यांची नियुक्ती होणार ते प्रकुलपती म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती होणार व त्या माध्यमातून विद्यापीठाच्या सर्व कामकाजामध्ये राजकीय ढवळा ढवळ करणार. यामुळे विद्यापीठांचे राजकिय हस्तक्षेप थांबविण्यासाठी धरणगाव तालुका भाजपा युवा मोर्चा यांनी तीव्र आंदोलन केले.

भाजपा युवामोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर निषेध करण्यासाठी जात असतांना धरणगाव पोलीस स्टेशन निरीक्षक शंकर शेळके यांनी कार्यकर्त्यांना जाण्यास प्रतिबंध करून नोटीस देऊन थांबलले.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष निर्दोष पवार, ता. सरचिटणीस टोनी महाजन, सरचिटणीस सचिन पाटील, शहराध्यक्ष भूषण कखंरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल पाटील, गोपालजी पांडे, योगेश ठाकरे, शहराध्यक्ष दिलीप माळी, सरचिटणीस कन्हैय्या रायपूरकर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!