मुक्ताईनगर येथे लाईनमन दिवस उत्साहात साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे महावितरणतर्फे पहिला लाईनमन दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

लाईनमन / जनमित्र / वायरमन विविध व्याख्येमध्ये असलेले महावितरण चा एक महत्वपूर्ण घटक लाईनमन यांचे कार्य कंपणीसाठीच नव्हे तर देशाच्या विकासासाठी फार उल्लेखनिय आहे. याची दखल केंद्र शासनाने घेऊन देशभरात दिनांक.४ मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देशीत केले. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ,मर्या.मुक्ताईनगर विभाग अंतर्गत कर्मचारी अधिकारी यांनी आज ’लाईनमन दिवस’ साजरा केला.

मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. लाईनमन दिनी प्रामुख्याने सर्व जनमित्र यांचे वैद्यकीय देखभालीची काळजी घेत. आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आहे. त्यामध्ये तब्बल ७० कर्मचार्‍यांनी सहभाग घेत सुविधेचा वापर केला. विशेष म्हणजे विभागातील ९०% जनमित्रांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली सर्व जनमित्रांना प्रकाशदूत म्हणून गौरविण्यात आले व एकूण ४९ कर्मचार्‍यांना तांत्रिक/महसूल कामात विशेष योगदान बाबत प्रमाणित करण्यात आले.

मुक्ताईनगर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांनी सर्व कर्मचारी अधिकारी यांना सुरक्षे विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.व सर्व अधिकारी कर्मचारी जनमित्र अभियंते यांनी सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली. त्यावेळी मुक्ताईनगर उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता ज्ञानेश्वर ढोले , वरणगाव चे तुषार गजरे व बोदवडचे सचिन मुंढे हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी मुक्ताईनगर विभागातील सर्व अभियंते,कर्मचारी , अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वराडे यांनी तर आभार प्रदर्शन गणगणे यांनी केले.

Protected Content