Home Cities जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

0
56


जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजता अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी  प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. 

यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, कार्यालय अधीक्षक आर. यु. शिरसाठ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. संदीप पटेल, डॉ. विजय गायकवाड, डॉ विलास मालकर, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. संगिता गावित, कर्मचारी अनिल  बागलाणे, महेश गुंडाळे, लीलाधर कोळी, मुरलीधर चौधरी, रवि बागुल, मंगेश बोरसे,  आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound