जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील उमाळा गावातील ध्यान केंद्र येथील बांधकामाच्या साईटवरून लोखंडी सेंट्रींग प्लेटा आणि लोखंडी जॅक असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून दिल्याची घटना समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील उमाळा गावात ध्यान केंद्राचे बांधकामाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी सुरेश निंबा वाघ वय-४८ यांनी हे कामाचा ठेका घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचे बांधकामाचे साहित्य, लोखंडी सेंट्रिंग प्लेटा, लोखंडी जॅक असा मुद्देमाल ठेवण्यात आला होता. दरम्यान ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १० एप्रिल सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सेंट्रिंग प्लेटा आणि लोखंडी जॅक असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर ठेकेदार सुरेश वाघ हे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहे.