मालवाहू वाहनाच्या धडकेत वृध्द ठार तर दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ मार्गावर माऊली नगरनजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने मुरलीधर वासुदेव पराते (६०, रा. माऊली नगर, दूरदर्शन टॉवर जवळ) हे ठार झाले. तर त्यांचा मुलगा विजय मुरलीधर पराते (२५) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी १ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास झाला.  या प्रकरणी शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता  मालवाहू वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की,  खासगी नोकरी करणारे विजय पराते हे  दुचाकीने (क्र. एमएच १९, सीक्यू ५५४५) ने वडील मुरलीधर पराते यांच्यासह शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताजळगावकडून भुसावळकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (क्र. एमएच १९, सीवाय २३६६) धडक दिली. त्यात मुरलीधर पराते यांना गंभीर दुखापत झाली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच विजय पराते यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले.  या प्रकरणी विजय यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या मालवाहू चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विजय पाटील करीत आहेत.

Protected Content