भाजप महानगरतर्फे ‘घर तिथे रांगोळी’ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिला सशक्तिकरण करण्याच्या दृष्टीने घर तिथे रांगोळी स्पर्धेचं आयोजन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बेटी बचाव बेटी पढाओ विभागातर्फे करण्यात आले होते. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जळगाव, जिल्हा महानगर , बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका नीला चौधरी यांनी  जळगाव महानगरात ८ व ९ डिसेंबर यादरम्यान घर तिथे रांगोळी स्पर्धेचे  आयोजन  करण्यात आले होते.

या स्पर्धेत शहरातून ३०० ते ३५० महिलांनी सहभाग घेतला घर तिथे रांगोळी स्पर्धेचा आज बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई भोसले, माजी महापौर सीमाताई भोळे, महिला मोर्चा लोकसभा समन्वयक देवयानी ताई ठाकरे, सचिव रेखाताई वर्मा, बेटी बचाव बेटी पढाव महानगर संयोजिका निलाताई चौधरी, महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष दीप्ती ताई चिरमाडे, सरोज ताई पाठक, नीतू ताई परदेशी, उषाताई पाठक, ज्योतीताई बर्गे, रेखा राणा, रेखा ताई पाटील माजी नगरसेविका शुचिता ताई हाडा, गायत्री ताई राणे, सुरेखाताई तायडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या सर्व महिला पदाधिकारी, माजी नगरसेविका व स्पर्धक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Protected Content