किनगाव आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारीचा विनयभंग : उपसरपंचासह ४० जणांवर गुन्हा दाखल

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी वाद घालुन लज्जा वाटेल असे कृत केले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन किनगावचे उपसरपंच यांच्यासह सुमारे चाळीस जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळाळेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथे दिनांक ३० जुलै रोजी ७ १५ वाजेच्या सुमारास गावातील राहणारे शरद अडकमोल ( वय ३o वर्ष, उपसरपंच किनगाव ग्रामपंचायत) यांने व त्यांच्या सोबत असलेल्या सुमारे ३५ ते ४० लोकानी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या घरातमध्ये प्रवेश केला. व त्याने डॉक्टरांकडे लज्जा वाटेल असा नजरेने पाहून डिलेव्हरीच्या रुग्णासंदर्भात बोलुन शाब्दिक वाद घातला. त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रसंगी घरात त्याची पत्नी व दोन मुली सोबत दामु सिताराम साळुंके हे देखील या वेळी उपस्थितीत होते. त्यानंतर काही वेळेत ९ ४५ वाजेच्या सुमारास शरद अडकमोल हा पुन्हा ३० ते ४० लोक डॉ. महाजन ह्या दवाखान्यात असतांना सोबतआणलेल्या रिक्शात प्रसुतीचे पेशंट असल्याचे सांगुन पेशंटला दाखल करा असे बोलवुन वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. संशयीत आरोपी किनगावचे उपसरपंच शरद अडकमोल व त्याच्या सोबत असलेल्या सुमारे ३५ ते ४ ०जणांच्या विरूद्ध किनगाव प्राथमिक केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा लालचंद महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व किनगाव बिटचे पोलीस कर्मचारी उल्हास राणे तपास करीत आहे.

Protected Content