धरणगाव तालुक्यात आज १० रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून आज नव्याने १० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. धरणगाव शहरात ५ तर तालुक्यातील पाळधी, निंभोरा व पष्टाणे या गावाचा समावेश आहे. अशी माहिती निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे.

धरणगाव तालुक्यात आज नव्याने १० रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेच्या पार केला असून एकुण ५०६ रूग्ण झाले आहे. दरम्यान आज आढळून आलेले धरणगातील संजय नगर-१, नेहरू नगर-३, जैन गल्ली-१, तालुक्यातील पाळधी-२, निभोंरा-२, पष्टाणे-१ असे एकुण १० रूग्ण आढळले. एकुण ५०६ रूग्णांपैकी २९ मयत झालेत. तर ३६९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १०८ रूग्ण उपचार घेत आहे. या वृत्ताला निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.