


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हृदयविकाराने त्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार (एम.डी., डीएनबी कार्डिओलॉजी) यांची नियमित मासिक ओपीडी आता जळगावातील महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सुरू होत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रुग्णांची तपासणी, निदान आणि उपचार करण्यात येणार असून या महिन्यातील ओपीडी शनिवार, ११ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, आकाशवाणी चौक, विद्यानगर येथे होणाऱ्या या विशेष ओपीडीमध्ये छातीत दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार थकवा येणे, घबराट, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, हात-पायांवर सूज येणे तसेच हार्ट अटॅकची शंका असलेल्या रुग्णांची सखोल तपासणी करून आधुनिक उपचार दिले जाणार आहेत. डॉ. परिहार हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट तसेच जन्मजात हृदयरोग तज्ज्ञ असून प्रौढांसह बालकांमधील हृदयविकारांच्या निदान आणि उपचारात त्यांना विशेष प्राविण्य आहे. बालकांना वारंवार सर्दी-खोकला, न्यूमोनिया, दूध पिताना घाम येणे, वजन न वाढणे, खेळताना दम लागणे किंवा मूल निळे पडणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महादेव हॉस्पिटलमध्ये अॅडल्ट व पेडियाट्रिक 2D इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, होल्टर मॉनिटरिंग, कोरोनरी व पेरिफेरल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर प्रत्यारोपण, डिव्हाईस क्लोजर, बलून व्हॉल्व्होटॉमी, तसेच बायपास आणि ओपन हार्ट सर्जरी यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. हृदयविकारांचे वेळेत निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी पूर्वनोंदणी करून या विशेष ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे करण्यात आले आहे.



