चाळीसगावच्या ईदगाह मैदानावर मतदानाबाबत जनजागृती

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक स्तरावर 2024 हे निवडणुकीचे वर्ष असून जगामध्ये 59 देशात निवडणुका होत आहेत. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही देश आहे. भारतातही यावर्षी सात टप्प्यामध्ये निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. मतदार जागृत करून लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना जागृतीसाठी सायकल रॅली, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लोकगीत इत्यादी उपक्रम उपक्रम राबविलेले जात आहे. मतदान करा देश घडवा ही भूमिका घेऊन सहायक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांनी चाळीसगाव येथील ईदगाह मैदानावर मतदार जनजागृती प्रतिज्ञेचे वाचन केले व ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

येथील ईदगाह मैदानावर आज सकाळी ९ वाजता मुस्लिम बांधवांची नमाज पठण झाल्यानंतर जामा मशिदीचे इमाम हाफिज जुबेर यांनी मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत मुस्लिम बांधवाना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले,शहर पोलिस निरीक्षक संदिप पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, हाजी गफूर शेख, मुख्तार कुरेशी, अस्लम मिर्झा, अजिज खाटीक, रफिक मनियार आदि उपस्थित होते. चाळीसगावच्या इतिहासात प्रथमच ईदगाह मैदानाच्या आत येत वरील तिनही अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन एक सर्वधर्मसमभावाचे वेगळेपण जपले. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी “आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेऊन याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करुन आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” सदरील प्रतिज्ञेतून मराठी,हिंदी,या दोन भाषेतून आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content