महिलेचा विनयभंग तर मुलीला केली शिवीगाळ व दमदाटी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील धान्य मार्केट परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा हात पकडून विनयभंग केला तर तिच्या मुलीला शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील धान्य मार्केट परिसरात ४२ वर्षे महिला आपल्या मुलीसोबत वास्तव्याला आहे. दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून मंगळवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी विशाल विजय सोनवणे, उमेश सोनवणे, सागर रमेश वाघ आणि विकास मंगल कुमावत सर्व रा. फरशी रोड, अमळनेर या चौघांनी महिलेच्या घरात घुसून तिचा हात पकडत विनयभंग केला. तसेच त्यांच्यास मुलीला शिवीगाळ करत दमदाटी केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने अमळनेर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवार १० एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content