Home Cities पारोळा एरंडोल तालुक्यात भाजपला खिंडार; पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

एरंडोल तालुक्यात भाजपला खिंडार; पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश

0
43

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील ग्रामीण भागातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला जय श्रीराम करत पारोळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे एरंडोल तालुक्यात भाजपाला मोठा भागदड पडल्याचे पहायला मिळाले.

मौजे खडके सिम, गणेशनगर तांडा तालुका एरंडोल येथील भाजपात असलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने(पाटील) यांच्या अध्येक्षते खाली व उपजिल्हाप्रमुख दशरथ भाऊ महाजन तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख रविंद्र चौधरी, एरंडोल शिवसेना उपतालुकाप्रमुख दिपक राजपूत, विभाग प्रमुख किशोर महाले, वनकोठे शिवसेना शहरप्रमुख भारत चौधरी, अविनाश जोगी मार्गदर्शनाखाली शिवसेना उ.बा.ठाकरे पक्षात झाला पक्ष प्रवेश झाला.

यांनी केला जाहिर प्रवेश
राजू जोगी भाजपाचे जिल्हासरचिटणीस तथा माजी ग्रामपंचायत सदस्य, सुनील जोगी जोगी समाज संघटना, ताप्रमुख प्रकाश जोगी, युवा तालुका प्रमुख धरमसिंग जोगी, गोकुळ अहिरे, दलितसेवा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ जोगी, तुकाराम जोगी, विकास जोगी, राजू जोगी, नाना जोगी, नाना वंजारी ग्रापं सदस्य अशोक जोगी, नाथ जोगी,उपतालुका प्रमुख सोबत सर्व गणेशनगर तांडा, खडके सिम मित्र परिवार यांनी प्रवेश केला आहे. यावेळी पारोळ्याचे शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे पारोळा येथील शिवदूत अमोल पाटील, वाहतूक सेना तालुकाप्रमुख तुषार पाटील, कट्टर शिवसैनिक लखन दादा वाणी यांच्यासह शिवसेना उ.बा.ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound